नमस्कार मित्रानो
मित्रानो भाद्रपद अमावस्या 25 सप्टेंबर म्हणजेच रविवारी येत आहे. या दिवशी चार ग्रहांपासून शुभ योग तयार होत आहे. या दिवशी चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. यामुळे कन्या राशीत चार ग्रहांचा शुभ संयोग होईल.
या संयोजनात बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण योगाचाही सहभाग असेल. या संयोगाचा प्रभाव प्रत्येक राशीवर पडणार आहे , परंतु विशेषतः या 5 राशींसाठी हा योग आनंददायी परिणाम देणारा ठरणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत.
मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी भाद्रपद अमावस्ये नंतरचा काळ खूपच लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. या काळात विरोधक आणि शत्रूंवर विजय मिळेल. करिअरच्या दृष्टीनेही हा योग मेष राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी ठरणार आहे. करिअरमध्ये खूप प्रगती होईल. बढतीपासून ते नोकरीत बदलही होऊ शकतो. तब्येत सुधारेल. विद्यार्थ्यांनाही यश मिळेल.
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग शुभ संधी घेऊन येईल. या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा व मानसन्मान वाढेल. प्रेमसंबंधात गोडवा येईल. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. तरुणांचे विवाह संबंध निश्चित होऊ शकतात. फॅशन, कला, दागिने, कपडे यांचा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांसाठीही हा योग खूप फलदायी असणार आहे. पालकांच्या मदतीने अडचणी दूर होतील. वडिलोपार्जित संपत्तीत वाढ होईल. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्यांची इच्छा पूर्ण होईल. कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल.
धनु रास
धनु राशीच्या दहाव्या घरात चार शुभ ग्रहांचा संयोग आणि लक्ष्मी नारायण योगाच्या निर्मितीमुळे हा काळ धनु राशीसाठी फलदायी ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगती होईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांचे प्रयत्न यशस्वी होतील. त्यांना कुठूनही चांगल्या ऑफर मिळू शकतात. कुटुंबात प्रभाव वाढेल. आर्थिक समस्या दूर होतील.
मीन रास
भाद्रपद अमावस्येला 4 ग्रहांमुळे तयार झालेला शुभ योग मीन राशीच्या लोकांसाठीही अगदी योग्य असणार आहे. या काळात तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. वैवाहिक जीवन मधुर होईल आणि संबंध दृढ होतील. मीडिया आणि राजकारणात काम करणाऱ्या लोकांसाठी काळ खूप चांगला आहे. त्यांना एक प्रकारचे यश मिळू शकते. लाइफ पार्टनरसोबत नवीन व्यवसाय सुरू करू शकता.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.