हे कृत्य केल्यानंतर आंघोळ करत नसाल तर लागेल भयंकर पाप.. जाणून घ्या चाणक्यनीती काय सांगते.

0
22390

नमस्कार मित्रानो

मित्रांनो जुने जाणकार सांगतात की हे घाणेरडे काम केल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुतले पाहिजेत. आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या पुस्तकात देखील सांगितले आहे की, व्यक्तीला हे काम केल्यानंतर स्नान करणे अगदी जरुरीचे आहे.

तुम्ही जाणून घ्याल तर आश्चर्यचकित व्हाल. सर सलामत तो पगडी पचास, अर्थातच चांगले स्वास्थ असेल तर तेच तुमचे सगळ्यात मोठे धन आहे. यामुळेच आरोग्याला लक्षात ठेवून अनेक प्रकारचे नियम बनवले आहेत.

चांगल्या प्रतीचे अन्नपदार्थ खाण्यापिण्या सोबतच, राहणीमान आणि सवयींचा देखील आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो. अनेक रोग आजार केवळ रोज आंघोळ केल्यानेच दूर राहतात.

दैनंदिन जीवनात वैयक्तिक स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का? काहीही होऊ देत व्यक्तीला हे घाणेरडे काम केल्यानंतर आंघोळ करणे जरुरीचे ठरते.

आर्य चाणक्य यांनी यासंबंधी चार असे कार्य सांगितले आहेत जे केल्या नंतर त्या व्यक्तीने त्वरित आंघोळ केली पाहिजे. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊयात काय आहे ते काम.

1. आचार्य चाणक्य सांगतात की स्वस्थ शरीर आणि चमकदार त्वचेसाठी आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी तेल मालिश करणे गरजेचे आहे. यानंतर शरीरातील रंध्रे छिद्र ओपन होतात आणि आतील मळ बाहेर येतो. तेल मालिश केल्यानंतर त्वरित आंघोळ केली पाहिजे. या मुळे शरीरावर साठलेला सर्व मळ साफ होतो. त्वचेला तेज व चमक येते.

2. चाणक्य सांगतात की, स्मशानात जाऊन घरी आल्यानंतर त्वरित आंघोळ केली पाहिजे. स्मशानातील वातावरणामध्ये विभिन्न प्रकारचे किटाणू आणि जंतू असतात. जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. स्मशानात अनेक नकारात्मक ऊर्जेचा वास असतो तेव्हा घरी आल्यानंतर सर्वप्रथम आंघोळ केली पाहिजे.

3. स्त्री संबंधानंतर देखील अंघोळ करणे अनिवार्य आहे. या प्रसंगानंतर पवित्रता भंग होते. यामुळे अंघोळ केल्यानंतर पवित्र होणे उचित आहे. धर्मशास्त्रानुसार कोणत्याही पती-पत्नीला संबंध बनवल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या पूजापाठ अथवा धार्मिक स्थळी सामील नाही झाले पाहिजे.

याप्रसंगी ईश्वराचे नाव देखील घेतले नाही पाहिजे आणि नाही स्वयंपाक घरात प्रवेश केला पाहिजे. आंघोळ केल्यानंतर वरील सर्व प्रकारची कामे तुम्ही करू शकता.

4. आचार्य चाणक्य सांगतात की, हजामत केल्यानंतर (केस कापल्यानंतर ) त्वरित स्नान केले पाहिजे. केस कापल्यानंतर पूर्ण शरीरावर छोटे छोटे केस चिटकून राहतात.

या परिस्थितीमध्ये अंघोळ करणे आवश्यक ठरते. नाही तर हेच केस आपल्या तोंडात डोळ्यात जाऊ शकतात. यामुळे आपण आजारी देखील पडू शकतो. आपल्या केसांत नकारात्मकतेचा वास असतो.

तेव्हा वेळोवेळी अस्वच्छ वाटल्यास आंघोळ करा आणि आपल्या वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या. अनेक आजारांना दूर ठेवा आणि दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरु नका. धन्यवाद!

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here