नमस्कार मित्रांनो,
मित्रानो लग्नात दोन अनोळखी व्यक्ती संपुर्ण जीवनासाठी अतूट पवित्र बंधनात बांधले जातात. पण या अतूट बंधनात बांधले जाण्यापूर्वी त्यांना एकमेकांना ओळखण्यासाठी खूपच कमी वेळ मिळतो.
अशामध्ये प्रत्येक स्त्री आणि पुरुषाच्या मनात हे प्रश्न नक्की येतात की भेटल्यानंतर पहिला काय विचारायचे ज्यामुळे आपण आपल्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल जाणून घेऊ शकतो, कारण एका चुकीच्या जोडीदाराची निवड आपले संपूर्ण जीवन बरबाद करू शकते.
मित्रान तुमची हीच दुविधा दूर करण्यासाठी आम्ही आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले काही प्रश्न सांगणार आहोत जे लग्नासाठी मुलगी पाहायला गेल्यावर नक्की विचारले पाहिजेत.
चाणक्य नितीनुसार कोणतीही मुलगी पाहायला गेल्यावर त्या मुलीला हा प्रश्न विचारला पाहिजे की, तू या लग्नासाठी तयार आहेस की नाही ? हे लग्न करणे तुझा स्वतःचा निर्णय आहे का ? कारण खूप ठिकाणी अस ही होत की मुलीला लग्नासाठी जबरदस्ती केली जाते मग त्यामागे कारण काहीही असो.
त्या मुलीचे उत्तर काहीही असो तिच्या बोलण्यावरून आणि हावभावावरून तिच्या मनात चाललेले सत्य आपण समजू शकतो. कारण जीवनाच्या एवढ्या मोठ्या निर्णयात मुलगी स्वतःच्या संमतीने तयार असणे आवश्यक आहे.
त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. कारण या नात्यामध्ये येणारा व्यक्ती जर कोणत्याही दबावामुळे तयार होत असेल तर ते नाते टिकणे कठीण असते.
जर तुम्ही मुलगी पहायला गेला तर दुसरा प्रश्न हा विचारून घ्या की ती आपल्या जोडीदारामध्ये काय पहाते किंवा तिला कोणत्या टाईप चा जोडीदार हवा ? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तिच्यासमोर पर्याय ही ठेऊ शकता जस की सामान्य आणि मध्यम वर्गीय मुलगा पसंद आहे की सुंदर आणि श्रीमंत यावरून हे समजेल की त्या मुलीला आपल्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत.
तुम्ही हे सुद्धा जाणून घेणे आवश्यक आहे की ती मुलगी शाकाहारी आहे की मांसाहारी. वर्तमानात लोकांच्या विचारांमध्ये खूप बदल झाले आहेत. पण विविध धर्म असलेल्या या देशात एकाच धर्माचे असूनही त्याच घरात एखादा मांसाहारी असू शकतो किंवा एखादा शाकाहारी असू शकतो.
तुम्ही हे जाणून घेणे आवश्यक आहे कारण ती जर मांसाहारी असेल तर तिलाही तिचा जोडीदार मांसाहारी हवाय किंवा काय ती शाकाहारी परिवारात राहू शकते ? याविषयी जाणून घेऊनच या नात्याला संमती द्या. कारण काही घरामध्ये या गोष्टीवरून ही नाते खराब होऊ शकते.
एका सुखी दाम्पत्यासाठी मुलगीची आवड, निवड जाणून घेणे महत्वाचे असते. जस की मुलीला कोणत्या प्रकारची जीवनशैली आवडते, कोणत्या प्रकारचे कपडे आवडतात, तिला खाण्यात काय आवडते आणि ती कोणत्या प्रकारची गाणी ऐकते.
तिला शांत जीवन आवडते की रोमांस वाले ? कारण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांच्या वरून दोघांच्या मधील साम्यता लक्षात येते. त्याचबरोबर सुखी दाम्पत्य जीवनासाठी त्या मुलीच्या रोजगाराबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.
तिला लग्नानंतर एक गृहिणी सारखे आपले जीवन व्यतीत करायचे आहे कि जॉब करायचा आहे ? कारण काही मुलांना मुलीने आपल्या जॉब बद्दल गंभीर झालेले अजिबात आवडत नाही, त्याला वाटत असते की तिने सर्व सोडून आपल्या परिवाराकडे लक्ष द्यावे. त्यामुळे हे सुद्धा तुमच्या जीवनाला प्रभावित करू शकते. त्यामुळे हे लग्नाआधीच स्पष्ट करा.
त्याचबरोबर मुलीला एकत्र कुटुंबात राहायला आवडते की विभक्त हे ही जाणून घेणे म्हत्वाचे आहे. तुम्ही जर जॉब साठी बिजनेस साठी वेगळे राहत असाल तर ठीक आहे पण जर तुम्ही आधीपासूनच एकत्र कुटूंबात राहत असाल तर हे माहीत करून घेणे महत्वाचे आहे कारण यावरून ही घरात भांडण होऊ शकते. आचार्य चाणक्य यांच्या नुसार एका मुलीसोबत लग्न करण्यासाठी हे प्रश्न पुरेसे आहेत.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.