अंत यात्रेमध्ये प्रेताला खांदा देणाऱ्यांनो एकदा इकडे लक्ष द्या…

0
529

नमस्कार मित्रांनो

मित्रानो जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या अंतिम यात्रेत सहभागी होण्यासाठी मित्र काय तर अनेकदा त्याचे शत्रूही येतात. अंतिम संस्काराच्या क्रिया तसेच प्रेताला खांदा द्यायला ही मागे राहत नाहीत.

पण तुम्हाला माहीत आहे का की हिंदू धर्म ग्रंथामध्ये प्रेताला खांदा देत असताना काही सावधानी पाळायला सांगितली आहे. पण याबद्दल काही लोकांना माहिती नाही. आजच्या या लेखात आपण हीच माहिती घेऊया की प्रेताला खांदा देणाऱ्यानी कसे सावध रहावे.

हिंदू धर्म ग्रंथानुसार जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीच्या अंतिम यात्रेत सहभागी होत असेल किंवा प्रेताला खांदा देत असेल तर हे एक शुभ कार्य मानले जाते आणि यामुळे त्याच्या पुण्यात वाढ होते.

याच्या प्रभावामुळे त्याचे मागील केलेले पाप देखील नष्ट होतात. आपला देह सोडून जात असलेली आत्मा अभिवादीत करणाऱ्या व्यक्तीच्या तन मनातून सर्व संताप आपल्या सोबत घेऊन जातात त्यामुळे ही मान्यता माहित असणारे लोक शव यात्रेमध्ये सहभागी होण्यास व खांदा देण्यास कधीच चुकत नाहीत.

शास्त्रानुसार आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या अंतिम यात्रेत ही सहभागी झाले पाहिजे. आजही गावात आपल्या आसपास राहणाऱ्या घरात कोणाचा मृत्यू झाला तर घरात चूल पेटवत नाहीत आणि जोपर्यंत मृत व्यक्तीची अर्थी घेऊन जात नाहीत तोपर्यंत कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा पाठ करत नाहीत.

या मागे ही मान्यता आहे की, जिथे प्रेत असते त्याच्या आसपासची जागा सुद्धा नकारात्मक ऊर्जेने भरलेली असते ज्याला सुतक म्हणतात. शास्त्रामध्ये वर्णित असलेले ते संकेत जाणून घेऊया जे शव यात्रेमध्ये सहभागी होतात किंवा अर्थिला खांदा देतात लक्षात ठेवले पाहिजेत.

जर मृत व्यक्ती ब्रह्मण असेल आणि त्या मृत व्यक्तीला तुम्ही खांदा देत असाल तर तुम्हाला हे ऐकून हैराणी होईल की एक पाऊल चालल्याने एक यज्ञ केल्यासमान पुण्य मिळते.

एक नियम असा ही आहे की जो व्यक्ती ब्रह्मचारी आहे तो व्यक्ती कोणाच्याही अर्थीला खांदा देऊ शकत नाही आणि त्याच्या शव यात्रेत ही सहभागी होऊ शकत नाही. तो फक्त आपले आई वडील आणि गुरू यांना खांदा देण्याचा अधिकारी आहे.

हा नियम जर माहित नसेल आणि एखादा ब्रह्मचारी व्यक्ती एखाद्याच्या शवाला खांदा देत असेल तर त्याचे ब्रह्मचार्य खंडित होते. मुक्तिधाम मध्ये प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अनुचित प्रकार किंवा हसणे करू नये आणि जर असे कोण करत असेल तर वेळ आल्यावर त्याला देवांना उत्तर द्यावे लागेल.

अंतिम संस्कार झाल्यावर पाठीमागे वळून बघू नका आणि नदी किंवा तलावात वस्त्रासोबत अंघोळ करा आणि मृत व्यक्तीच्या नावाने जल अर्पण करा आणि काही न बोलता घरी जा.

जे लोक शव यात्रेत सहभागी होतात त्यांना एक दिवस, प्रेत शिवणाऱ्याना तीन दिवस तर खांदा देणाऱ्याने आठ दिवस सुतक पाळले पाहिजे. हे तुम्हाला माहीतच असेल की सुतक पाळत असताना मंदिर तसेच धार्मिक कार्यात सहभागी होऊ नये.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here