आंघोळ न करता हि 5 कामे करणारी स्त्री संपूर्ण कुटुंब बरबाद करते.

0
92

हिंदू धर्मात दररोज सकाळी स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. आंघोळ न करता पूजा करणे, अगदी आंघोळ न करता स्वयंपाकघरात जाण्यास देखील मनाई आहे. हिंदू धर्मात महिलांना घरची लक्ष्मी म्हटले जाते.

महिलांना देवीचे रूप मानले गेले आहे, म्हणून हिंदू धर्मग्रंथांमध्ये स्त्रियांबद्दल काही नियम सांगण्यात आले आहेत. जर घरातील स्त्रीने या नियमांचे पालन केले तर घरात नेहमी सुख-शांती राहते.

आज आपण अशाच काही कामांबद्दल जाणून घेणार आहोत जे महिलांना आंघोळ केल्याशिवाय करणे निषिद्ध आहे. ते न पाळल्यास घरात दारिद्र्य, नुकसान , आजारपण येण्यास वेळ लागत नाही.

महिलांनी आंघोळ केल्याशिवाय कधीही तुळशीत पाणी घालू नये. तुळशीला पूजनीय मानले जाते, तुळशीला अशुद्ध हातांनी स्पर्श केल्याने किंवा स्नान न करता पाणी घातल्याने लक्ष्मीचा कोप होतो. फक्त स्त्रियांनीच नाही तर कोणीही स्नान केल्याशिवाय तुळशीला स्पर्श करू नये किंवा पाणी घालू नये.

महिलांनी आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात प्रवेश करू नये. अन्नातून ऊर्जा मिळते. अशुद्धतेने बनवलेले अन्न नकारात्मकता देते. त्यामुळे महिलांनी आंघोळीनंतर नेहमी अन्न तयार करावे.

तसेच आंघोळ न करता अन्न शिजविणे हा अन्नपूर्णा मातेचा अपमान मानला जातो. तिला लक्ष्मीचे रूप मानले जाते. असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात दरिद्रता येते.

आंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये. हा नियम महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी पण आहे. आंघोळ न केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि माणूस आळशी बनतो. आंघोळीने उत्साह येतो आणि मनात चांगले विचार येतात.

तसेच काही महिलांना सकाळी उठल्या उठल्या केस विंचरण्याची सवय असते, ही सवय महिलांसाठी अजिबात चांगली नाही. शास्त्रानुसार महिलांनी सकाळी लवकर आंघोळ केल्यावरच केसांना फणी लावावी.

धन हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. आंघोळ न करता पैशाला हात लावल्याने लक्ष्मीचा अपमान होतो आणि तिला राग येतो. यामुळे माणूस गरीब होतो. महिलांनी आंघोळीशिवाय कधीही पैशाला हात लावू नये.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here