14 मार्च आमलकी एकादशी. 1 आवळा यामध्ये बुडवा. लाखो नाही करोडो मध्ये खेळाल.

0
512

नमस्कार मित्रानो

मित्रानो १४ मार्च सोमवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे आमलकी एकादशी. या एकादशीस आवळ्याच्या वृक्षाचं पूजन केलं जात. अशी मान्यता आहे कि आवळ्याच्या वृक्षात प्रत्यक्ष भगवान श्री हरी श्री विष्णू वास करतात.

जी व्यक्ती आमलकी एकादशीस आवळ्याच्या वृक्षाची पूजा करते तिला एक हजार गोदाना इतकं पुण्य प्राप्त होत. सोबतच ज्या घरातील लोक आवळ्याचे नित्य नियमाने सेवन होते त्या घरावर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहतात.

या आमलकी एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करताना पाण्यात आवळ्याची पावडर , रस किंवा आवळ्याची पाने टाकून त्या पाण्याने आपण स्नान करा. या एकादशीच्या दिवशी आवळ्याचं उटणं लावण्याची देखील प्रथा आहे.

मित्रानो या आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याचा एक छोटासा उपाय आपण आवर्जून करा. आपल्या घरात धन , धान्य , समृद्धी ,बरकत या गोष्टींची कमतरता कधीच भासणार नाही. घरातून गरिबी निघून जाईल.

हा उपाय करण्यासाठी आपण एका तांब्यापासून बनलेल्या कलशामध्ये पाणी घ्यावं आणि त्या पाण्यात एक आवळा टाकावा. त्या नंतर जवळपासच्या शिवालयात म्हणजेच शिवशंकरांच्या मंदिरात जायचं आहे.

तिथे गेल्यानंतर हे आवळा युक्त जल शिवलिंगावर अर्पण करायच आहे. अर्पण करताना ओम नमः शिवाय या महामंत्राचा सातत्याने जप करा. महिलांनी नमः शिवाय ओम असा जप करत शिवलिंगावर जल अर्पण करावं.

पाणी संपल्यानंतर त्या पाण्यातील जो आवळा आहे तो सुद्धा आपण शिवलिंगावर अर्पण करायचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर मंदिरात जाताना थोडीशी आवळ्याची पाने देखील घेऊन जा आणि हि पाने आपण शिवलिंगावर अर्पण करावीत.

आपली जी इच्छा आहे , मनोकामना आहे ती भगवान शिवशंभुंना बोलून दाखवावी. मित्रानो या दिवशीची आमलकी एकादशी सोमवारच्या दिवशी आल्याने आपण हा उपाय करत आहोत. आवळा हा भगवान शंकराला तितकाच प्रिय आहे जितका माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंना.

असा हा आवळा शिवलिंगावर अर्पण केल्या नंतर आणि आपली इच्छा बोलून दाखवल्यानंतर हा आवळा तिथून उचलून आपण नंदी देवाजवळ जायचं आहे आणि नंदी देवाने जो पाय उचलेला आहे त्या पायाखाली हा आवळा ठेवायचा आहे.

आपली जी इच्छा आहे , समस्या आहे , मनोकामना आहे ती नंदी देवांच्या कानात बोलून दाखवायची आहे. हि इच्छा बोलून झाल्यानंतर शिव मंदिरात आपण पाच दहा मिनिट बसा. भगवान शिव शंकरांच्या कोणत्याही मंत्राचा त्या ठिकाणी बसून जप करा.

मंत्र जप झाल्यानंतर तो नंदीच्या पायाशी ठेवलेला आवळा उचलून आपण आपल्या स्वगृही यायचा आहे. घरी आल्या नंतर हा आवळा आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या चरणी ठेवायचा आहे. त्यांच्या चरणी ठेवण्यापूर्वी या आवळ्यावर हळदीचे लेपन करा.

हळद घेऊन या आवळ्याच्या संपूर्ण अंगाला आपण लावायची आहे. संपूर्ण आवळा या हळदी मध्ये बुडवायचा आहे आणि हा लपलेला आवळा आपण माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंच्या चरणी म्हणजेच देवघरात ठेवायचा आहे.

मित्रानो संपूर्ण दिवसभर आवळा त्याच ठिकाणी ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणेजच मंगळवारी ज्या दिवशी द्वादशी तिथी आहे त्या दिवशी आवळा उचलून आपल्या तिजोरी मध्ये ठेवायचा आहे.

जिथे तुम्ही धन ठेवता , सोन नाणं ठेवता , मौल्यवान वस्तू ठेवता तिथे हा आवळा ठेवायचा आहे. मित्रानो तीन चार दिवसानंतर हा आवळा त्या ठिकाणाहून उचलून नजीकच्या वाहत्या पाण्यात त्याच विसर्जन करायचं आहे.

मित्रानो जर वाहत पाणी जवळपास नसेल तर जवळच्या पिंपळ वृक्षाखाली किंवा आवळ्याच्याच वृक्षाखाली किंवा बेलपत्राच्या झाडाखाली आपण हा आवळा ठेवू शकता.

मित्रानो हा उपाय जर तुम्ही पूर्ण विश्वासाने , श्रद्धेने आणि मोकळ्या मनाने केलात तर आपल्या मनातील कोणत्याही इच्छेची पूर्तता आणि विशेष करून धन संबंधित समस्या त्वरित संपुष्टात येतात.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here