नमस्कार मित्रांनो
मित्रानो आज आम्ही तुम्हाला आचार्य चाणक्य यांच्या अद्भुत ज्ञाना बद्दल सांगणार आहोत. आचार्य चाणक्य सांगतात की खोटं बोलणे, कठोरता, छळ करणे, लालच, अपवित्रता, निर्दयता स्त्रियांचे नैसर्गिक दुर्गुण असतात.
आचार्य चाणक्य म्हणतात अशा पुरुषाने व्यक्तीने धर्तीवरच स्वर्ग मिळवला आहे ज्याची पत्नी आज्ञाकारी आहे, ज्याची पत्नी पतीच्या इच्छेनुसारच वागते आणि जिला त्याच्या धनावर संतोष आहे.
मित्रांनो जेवण बनवण्याची क्षमता, सुंदर स्त्री आणि तिला भोगण्यासाठी काम शक्ती, पर्याप्त धन तसेच दान करण्याची भावना अशा संयोगाचे असणे सामान्य तपाचे फळ नाही. आचार्य चाणक्य पुढे सांगतात की ज्यांची मुले समोर तर गोड गोड बोलतात पण मागे तुम्हाला बरबाद करण्याची योजना बनवतात.
अस करणारे विशाच्या घड्या प्रमाणे आहेत. पुत्र तोच आहे जो आपल्या वडिलांचे म्हणणे ऐकतो आणि वडील तेच आहेत जे आपल्या मुलांचे पालन पोषण व्यवस्थित करतो आणि पत्नी तीच आहे जीच्यापासून सुख प्राप्त होईल.
आचार्य चाणक्य पुढे म्हणतात वाईट मित्रावर तर कधीच विश्वास ठेवू नका आणि चांगल्या मित्रावर ही विश्वास करू नका. जर असे लोक तुमच्यावर चिडले तर तुमचे सर्व रहस्य उघड करतात.
चाणक्य म्हणतात मूर्ख असणे दुखदायी आहे, तारुण्य पण दुखदायी आहे पण यापेक्षा दुखदायी म्हणजे कोणाच्या दुसऱ्याच्या घरी जाऊन त्याच्याकडूनच उपकार घेणे. मनात असलेले प्लॅनिंग किंवा कार्य दुसऱ्या समोर सांगू नका या उलट मनन करत त्या कामाचे स्मरण करा व ते कार्य पूर्ण करा.
प्रत्येक झाड सावली देते परंतु प्रत्येक झाड चंदनाचे नसते. आचार्य चाणक्य पुढे सांगतात की जे आई वडील आपल्या मुलांना शिक्षण देत नाहीत ते आपल्या मुलांसाठी शत्रू प्रमाणे आहेत. कारण विद्याहिन बालकांचा विद्वान लोकांच्या सभेत तिरस्कार केला जातो. जसे हंसांच्या सभेत बगळ्यांचे होते.
चाणक्य नीति म्हणते की अशा पत्नीने जी आपल्या पतीवर खूप प्रेम करते, तिने नेहमी पतीशी खरे बोलावे आणि कोणत्याही परिस्थितीत त्याची साथ दिली पाहिजे. अशा पत्नीच्या सहवासामुळे पतीचे आयुष्य बदलून जाते. त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.
जी स्त्री दररोज भगवंतांचे व तुळशीचे पूजन करते , घरात देवाजवळ दिवा लावते , तुळशीजवळ दिवा लावते , स्वयंपाक झाला कि आधी भगवंताला नैवैद्य देते नंतरच सर्वजण भोजन करतात त्या स्त्रीमुळे घरातील नकारात्मकता निघून जाते व घरातील वातावरण पवित्र व शुद्ध होते. अशा वातावरणात राहणारे कुटुंब सुखी व आनंदी असते.
जी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर समाधान मानते , जास्त हव्यास करीत नाही अशा स्त्रीचा पती देखील तिच्यावर आनंदी राहतो. काही स्त्रिया शेजारी एखादी वस्तू आली कि आपल्या सुद्धा घरी ती वस्तू यायलाच हवी असे वर्तन करतात. यांच्या इच्छा पूर्ण करता करता त्यांच्या पतीच्या नाकी नऊ येतात.
पत्नीच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पतीला वाईट कामात गुंतावे लागू शकते , व त्याचे वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणून जर स्त्री समाधानी असेल , तिच्या गरज मर्यादित असतील तर त्या पूर्ण करताना पतीला देखील जास्त कष्ट करावे लागत नाहीत व घरातील वातावरण आनंदी आणि समाधानी असते.
वाईट परिस्थिती मध्ये देखील न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद स्त्री मध्ये असावी. कितीही वाईट परिस्थिती असली तरी स्त्री भक्कम पणे आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी असेल तर वाईट परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. स्त्री खंबीर असेल तर वाईट काळात देखील लवकर मार्ग सापडतो.
जर स्त्री सारखी राग राग करीत असेल , चिडचिड करीत असेल तर त्या घरातील शांतता निघून जाते व भांडण , वादविवाद सरास होतात. म्हणून स्त्रीने संयमी व शांत असावे. समोरच्या व्यक्तीचे काही चुकत असेल तर त्याला जरूर विरोध करा पण प्रत्येक बाबतीत चिडचिड करून भांडणे करून घरातील वातावरण दूषित करू नका.
जी स्त्री कडू बोलते , टोचून बोलते , वाईट बोलते अशी स्त्री सर्वांबरोबर आपले संबंध बिघडवून ठेवते व वेळ प्रसंगी तिच्या कुटुंबियांसाठी कोणी धावून येत नाही. तिच्या अशा वागण्यामुळे संपूर्ण कुटुंब अडचणीत येते.
जी स्त्री प्रत्येक गोष्टीत समजूतदारपणा दाखवते , शांतपणे सर्व समजून घेते. जे आहे ते आहे आणि जे नाही ते नाही याचा शांतपणे स्वीकार करते , तसेच सर्वांशी चांगले वागते , गोड बोलते ते घर सुद्धा सुखी व आनंदी असते.
ज्या घरातील स्त्री सर्वांशी गोड बोलते त्या घराला कोणीही नाव ठेवत नाही. जी स्त्री शेजारी पाजारी सर्वांशी चांगले संबंध बनवून ठेवते अशा स्त्रीच्या कुटुंबावर संकट आले तरी सर्वजण तिच्या कुटुंबाला मदत करायला धावून येतात.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.