नमस्कार मित्रांनो
मित्रानो भगवान श्रीकृष्ण यांच्या नुसार घरातील स्त्री हि पाच काम करते त्या घरात लक्ष्मी कधीच निवास करत नाही. श्रीकृष्ण यांच्या नुसार प्रत्येक स्त्री ही लक्ष्मी समानच असते. तिचे गुण तसेच आचरण यामुळे तिच्या मध्ये लक्ष्मीचा वास असतो.
स्त्रियाच घरात सुख शांती आणि समृद्धीचे कारण असतात. पण जर एखादी स्त्री हे पाच कार्य करत असेल तर तिच्या घरात दुःख, दारिद्र्य आणि क्लेश यांचा वास होतो. श्रीकृष्ण यांच्या नुसार पती पत्नीचे भाग्य एकमेकांशी जोडलेले असते.
जर पतीने एखादे अनिष्ट कार्य केले तर त्याच्या पत्नीला ही त्याच्या पापाचे फळ भोगावे लागते. आणि जर कोणी स्त्री अनिष्ट कार्य करत असेल तर तिच्या पतीला ही त्याचे फळ भोगावे लागते.
म्हणूनच स्त्रीने आपल्या घरात कधीच कोणते चुकीचे किंवा अशुभ कार्य करू नये नाहीतर या कामामुळे तिच्या पतीच्या कार्यामध्ये बाधा निर्माण होऊ शकते. जी स्त्री गुणवान असते किंवा पावित्रवान असते, नवरा व घरातल्या वडीलधाऱ्या लोकांचा मान सन्मान करत असेल अशा स्त्रीवर माता लक्ष्मी सदैव मेहेरबान असते.
अशी स्त्री पतिव्रता असते. श्रीकृष्ण सांगतात की पतिव्रता स्त्रिया मुळेच कलियुगाचा प्रभाव वाढणार नाही. पतिव्रता स्त्रियांनीच पाप आणि दुराचार वाढण्यापासून थांबवले आहे. ज्या दिवशी पृथ्वीवर पतिव्रता स्त्री असणार नाही त्याच दिवशी कलयुगाचा अंत होईल.
शास्त्र सांगते की स्त्री व्रत, उपवास, पूजा पाठ यासारखे शुभ कार्य करून घरातील वातावरण पवित्र ठेवते तिच्या घरात सदैव लक्ष्मीचा वास असतो. पण याउलट जी स्त्री शास्त्रात वर्जित असणारे हे काम करते तिची पूजा, व्रत, उपवास याचे फळ ही व्यर्थ होते. म्हणून शास्त्रामध्ये स्त्रियांना हे पाच काम करण्यास मनाई केली आहे. चला तर मग जाणून घेऊया ते पाच काम जे केल्याने घरातील लक्ष्मी निघून जाते.
उशिरा पर्यंत झोपणारी स्त्री
शास्त्रानुसार स्त्रियांचे उशिरा पर्यंत झोपणे अशुभ आणि अमंगलकारी मानले जाते. स्त्रियांचे नाही तर घरातील प्रत्येक व्यक्तीने उशिरा पर्यंत झोपणे अशुभ असते. ज्या घरातील स्त्री सूर्योदय झाल्यावरही उशिरा पर्यंत झोपते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते.
शास्त्रानुसार उशिरा पर्यंत झोपणे आळशी प्रवृत्तीच्या लोकांची निशाणी आहे आणि आळशी लोकांजवळ धन कधीच येत नाही. उशिरापर्यंत झोपणाऱ्या स्त्रीच्या घरात वात्सुदोष उत्पन्न होतो. घराचे वातावरण अपवित्र होते. म्हणून स्त्रियांनी कधीच सूर्योदय नंतर झोपून राहू नये.
घर अस्वच्छ ठेवणे
वास्तुशास्त्र नुसार ज्या घरात स्वच्छता असते तीथेच लक्ष्मीचा वास असतो. ज्या घरात स्वच्छता नसते तिथे दारिद्र्य येते. जी स्त्री लवकर उठून घर स्वच्छ ठेवते, अंगण स्वच्छ करून दारात रांगोळी काढते व लक्ष्मीचे स्वागत करते त्या घरात सदैव सुख समृध्दी येते.
नियमित अंघोळ न करणे
शास्त्र सांगते जी स्त्री रोज अंघोळ करत नाही त्या घरात प्रेतांचा वास असतो. रोज आंघोळ न करणारी स्त्री अशुभ आणि अमंगल शक्तींना घरात आमंत्रण देते. स्त्रियांनी नित्य स्नान करणे अनिवार्य आहे.
स्नान करण्याची योग्य वेळ सूर्योदयाच्या पूर्वी असते. जे लोक 8 नंतर म्हणजे सूर्योदय झाल्यावर अंघोळ करतात त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होत नाही कारण हे स्नान राक्षस स्नान म्हणले जाते.
जेवण बनवणे
शास्त्रानुसार जी स्त्री अंघोळ न करता जेवण बनवते असे अन्न देवी देवता स्वीकार करत नाहीत असे जेवण अपवित्र असते. केस सोडून जेवण बनवणे सुद्धा अशुभ असते.
पूजा पाठ न करणारी स्त्री
शास्त्रानुसार जी स्त्री व्रत उपवास करत नाही किंवा पुजापाठ करत नाही, मंदिरात जात नाही ती खूपच अशुभ असते. अशी स्त्री सर्वांना दुःख देणारी असते. अशा स्त्री जवळ लक्ष्मी कधीच येत नाही. पुरुषाने अशा स्त्रीसोबत कधीच लग्न करू नेऊ जी अशुभ कार्य करते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.