नमस्कार मित्रानो
मित्रानो समाधानी जीवन जगणे प्रत्येकालाच वाटत असते. प्रत्येकाला जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती हवी असते. त्यासाठी बरेच जण प्रामाणिकपणे मेहनत करत असतात परंतु यश प्राप्त होईलच याची काहीच शास्वती नसते.
बरेच जण थोडीच मेहनत करून त्यांना लगेच खूप मोठे यश संपादन होत असते. हे फक्त आणि फक्त ग्रहदशेमुळे घडत असते. नकारात्मक ग्रहदशा जर व्यक्तीच्या जीवनात असेल आणि कितीही मेहनत केली तरी हवे तसे यश प्राप्त होत नाही.
ज्यावेळी ग्रहदशा शुभ आणि सकारात्मक असतात अशावेळी थोडीशी जरी मेहनत केली तरी खूप मोठे यश प्राप्त होत असते. मित्रानो नशिबाची साथ आपल्याला प्राप्त झाली कि आपल्याला त्याचे फळ योग्य प्रमाणात मिळत असते.
फक्त कष्ट , प्रयत्न करून यश मिळत नाही तर त्यासाठी नशिबाची जोड असणे अत्यंत आवश्यक असते. एप्रिल महिन्यात बनत असलेली ग्रहदशा या पाच राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत.
एप्रिल महिन्याची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत आहे म्हणजे एप्रिल महिन्यापासून मराठी नववर्षाची सुरवात होत आहे. येणारे हे नवे वर्ष या पाच राशींच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.
मेष रास
ग्रहदशा या काळात आपल्यासाठी अनुकूल बनत आहे. एकूणच हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. नशीब आता आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाला प्रयत्नांची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे.
मित्रानो आपला राशी स्वामी हा मंगळ आहे. मंगळ या काळात आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. खरे पाहता आपल्याला तरुण वयातच खूप संपत्ती प्राप्त होत असते. व्यापारात आपल्याला भरपूर लाभ प्राप्त होणार आहे. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.
आपला स्वभाव थोडासा क्रोध धारण करणारा आहे त्यामुळे या काळात क्रोधा पासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. या काळात कोणाच्याही मनाला लागेल असे बोलू नका. मन लावून मेहनत केल्यास यशाचे शिखर गाठण्यास वेळ लागणार नाही.
मिथुन रास
आता तुमच्या नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. ग्रहनक्षत्रांची शुभ स्थिती आपल्या जीवनात अनुकूल काळ घेऊन येणार आहे. आपल्या राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे या काळात आपल्या बुद्धिमत्तेला एक सकारात्मक चालना प्राप्त होणार आहे. जे आपण ठरवाल ते आपल्याला प्राप्त होणार आहे.
आपण घेतलेले निर्णय अतिशय सफल ठरण्याचे संकेत आहेत. आरोग्य देखील आपले उत्तम राहणार आहे. प्रत्येक कामात भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. एखाद्या स्त्री कडून आपल्याला लाभ प्राप्त होऊ शकतो. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आंधळे प्रेम घातक ठरू शकते.
आंधळ्या प्रेमामुळे मागील काळात आपले बरेच नुकसान देखील झाले असेल. आर्थिक क्षमता या काळात आपली मजबूत बनणार आहे. खर्च करणे टाळावे लागेल. मन लावून केलेली मेहनत या काळात फळाला येईल. आता सुखात वाढ होण्याची वेळ आलेली आहे.
कन्या रास
प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. ग्रहनक्षत्राची अनुकूल स्थिती परिस्थिती मध्ये परिवर्तन घडवून आणणार आहे. कार्यक्षेत्रात चालू असणाऱ्या नकारात्मक घडामोडी आता बदलणार असून अनुकूल काळाची सुरवात होणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होईल.
आपला स्वामी बुध आहे त्यामुळे व्यापारात आपल्याला चांगला लाभ प्राप्त होणार आहे. व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. नोकरी विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आर्थिक सुख संपन्नतेमध्ये वाढ होणार आहे.
येणाऱ्या काळात आर्थिक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. स्वतःच्या बुद्धिमतेचा योग्य वापर करून खूप मोठे यश संपादन करण्यात यशस्वी ठरणार आहात. प्रेम जीवनात , सांसारिक जीवनात हा काळ अनुकूल ठरणार आहे. पैशांची अडचण दूर होईल.
तूळ रास
आपला राशी स्वामी हा शुक्र आहे. आपल्या जीवनात आता शुक्र आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येणार आहेत. व्यापारातून भरपूर नफा आपल्याला प्राप्त होईल.
व्यवसायात आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. मागील काळात घडून गेलेल्या गोष्टींची पुन्हा आठवण काढून त्रास करून घेण्यापेक्षा येणाऱ्या काळाचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. मैत्रीचे नाते या काळात मजबूत बनणार आहे. मित्र आपली चांगली मदत करतील.
वृश्चिक रास
मंगळ आपल्या राशीचा स्वामी आहे. या काळात आपली ग्रहदशा विशेष अनुकूल ठरणार आहे. ग्रहनक्षत्र सर्वच दृष्टीने शुभ फलदायी ठरणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढे मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. ठरवलेली कामे आता पूर्ण होणार आहेत.
आपण आपल्या जीवनात करत असलेली मेहनत आता फळाला येणार आहे. करियर विषयी काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रात अनुकूल घडामोडी घडून येतील. व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.