या 5 राशी मार्च 2022 मध्ये बनतील महाकरोडपती.

0
5790

नमस्कार मित्रानो

मित्रानो परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. मनुष्य जीवनात स्थिती कधीही सारखी नसते. काळ चांगला असो किंवा वाईट असतो परिस्थिती मध्ये बदल घडून आल्याशिवाय राहत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार बदलत्या ग्रहनक्षत्राची स्थिती वेगवेगळा परिणाम करत असते.

बदलत्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येत असतात. ग्रहनक्षत्राची स्थिती जेव्हा नकारात्मक असते तेव्हा व्यक्तीला अनेक दुःख , अपयश , अपमान भोगावे लागतात.

अनेक प्रकारे त्रास सहन करावा लागतो पण हीच ग्रहदशा जेव्हा अनुकूल बनते तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही वाईट परिस्थिती चालू असुद्या ग्रहनक्षत्रांची शुभ स्थिती आपला भाग्योदय घडवून आणण्यासाठी पुरेशी असते.

मार्च 2022 मध्ये असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. मार्च मध्ये बनत असलेली ग्रहदशा , ग्रहांची राशांतरे , ग्रहयुत्या आणि एकूणच बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ परिणाम या 5 राशींच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत.

मार्च पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. आता नशिबाची दार उघडण्यास वेळ लागणार नाही. हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. आता भाग्य उदयास येणार आहे. आता प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने भरून येईल.

कार्यक्षेत्रात करियर , उद्योग , व्यापार ,नोकरी , समाजकारण , राजकारण अशा अनेक क्षेत्रांत आपल्याला यश मिळण्याचे संकेत आहेत. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

मेष रास

मेष राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. मार्च महिना आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे. आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत.

पैशांची तंगी , पैशांची अडचण आता दूर होणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे. नवीन व्यवसायाची सुरवात आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ दायक घडामोडी घडून येतील. नोकरीत अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. वैवाहिक जीवनात सुख शांती मध्ये वाढ होणार आहे.

मिथुन रास

मार्च महिन्याची सुरवात होताच चमकून उठेल मिथुन राशीचे भाग्य. उद्योग , व्यापारात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. अनेक दिवसांपासून भोगत असलेले दुःख आणि यातनांपासून आपली सुटका होणार आहे. आर्थिक अडचणी दूर होतील. राजकीय क्षेत्रात नावलौकिक वाढण्याचे संकेत आहेत. करियर मध्ये यश प्राप्त होइल.

सिंह रास

सिंह राशीवर ग्रहनक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे. नोकरीत बढतीचे योग येऊ शकतात. सांसारिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे. करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आर्थिक समस्या दूर होण्याचे संकेत आहेत. आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल.

तूळ रास

तूळ राशीला आता प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होतील. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. मार्च महिना आपल्या राशीच्या जातकांसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. नोकरीत अडलेली कामे मार्गी लागतील. नोकरी विषयी काळ अनुकूल ठरणार आहे. करियर मध्ये प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येतील. पैशांची तंगी आता दूर होईल. हाती पैसा खेळता राहील.

कुंभ रास

मार्च महिना कुंभ राशीसाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आता कुंभ राशीसाठी परिस्थिती अतिशय अनुकूल बनत आहे. व्यवसायातून आपली आर्थिक क्षमता मजबूत बनण्याचे संकेत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायातून आपल्या कमाई मध्ये वाढ होईल. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. कार्यक्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here