नमस्कार मित्रानो
मित्रानो हिंदू धर्मातील सर्वात मोठी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. मित्रानो आषाढी एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी देखील म्हटले जाते. कारण याच दिवशी या जगाचे पालनहार भगवान श्री हरी श्री विष्णू क्षीरसागरामध्ये शेष नागावर योग निद्रिस्त होतात.
तब्ब्ल चार महिने त्यांची हि योगनिद्रा चालते आणि या चार महिन्याच्या कालावधीस चातुर्मास असं म्हटलं जात. या चातुर्मासात आपल्याकडे अनेक प्रकारचे सण , व्रत , वैकल्य , उपवास केले जातात.
मित्रानो या चातुर्मासाच्या चार महिन्यांच्या काळात या श्रुष्टीचे संघालन देवाधिदेव महादेव चालवतात. चार महिन्यानंतर म्हणजेच कार्तिकी एकादशीला भगवान श्री हरी श्री विष्णू पुन्हा एकदा त्यांच्या चिरनिद्रेतून बाहेर येतात तो दिवस म्हणेज देवउठनी एकादशी.
मित्रानो जर तुम्हाला या दिवशी काही कारणास्तव भगवंतांची पूजा करणे शक्य झाले नाही तर राम कृष्ण हरी , राम कृष्ण हरी हा एक मंत्र दिवसभरात जास्तीत जास्त वेळा जप करा , या मंत्राच स्मरण करा. भगवंतांची कृपा आपल्यावर बरसल्याशिवाय राहणार नाही.
मित्रानो प्रत्येक व्यक्तीमध्ये देव वसलेला आहे. तो माणूस वाईट असो वा चांगला. म्हणूनच आपल्याकडून कोणाचे मन दुखावले जाणार नाही , कोणा बद्दल वाईट शब्द निघणार नाहीत याची काळजी आजच्या दिवशी नक्की घ्या.
जी व्यक्ती एकादशीच व्रत , उपवास करते मात्र एखाद्या व्यक्तीच मन दुखावते त्या व्यक्तीला त्या व्रताचं , पूजा पाठ केल्याचं फळ कदापि प्राप्त होत नाही. या दिवशी पूजा पाठ करताना निळे आणि काळे कपडे घालू नका. निळे आणि काळे कपडे परिधान करून भगवंतांची पूजा करणे शक्यतो आपण टाळावं.
आषाढी एकादशीला कोणत्याही प्रकारचे तामसिक पदार्थ आपण चुकून सुद्धा ग्रहण करू नका. यामध्ये मांसाहार तर आलाच सोबतच कांदा , लसूण कोणतेही मसालेदार पदार्थ सोबतच दारू , गुटखा , सिगारेट यांपासून आपण दूर राहावे.
मित्रानो हिंदू धर्मशास्त्रानुसार जेव्हा आपण व्रत करतो , कोणत्याही देवांच्या मंत्राचा जप करतो त्यासाठी ध्यान आणि एकाग्रता या गोष्टी फार महत्वाच्या असतात. आपण भगवंताच्या चरणी जर तल्लीन व्हायचं असेल तर एकाग्रता फार महत्वाची.
हे जे तामसिक पदार्थ असतात ते आपली एकाग्रता भंग करतात. मित्रानो या आषाढी एकादशीच्या दिवशी कोणावर सुद्धा क्रोध करणे , रागावणे पूर्णपणे टाळा. या दिवशी शांत रहा. संयमी वर्तन आपण या दिवशी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
या दिवशी चुकूनही ऐश ओ आरामात गादीवर किंवा कॉटवर झोपू नये. जमिनीवर एखाद वस्त्र जसे कि चादर वगैरे अंथरून आपण झोपावं. कॉटवर किंवा गादीवर झोपण्यास धर्मशास्त्रात मनाई आहे.
मित्रानो या दिवशी आपण तांदळाचं सेवन जसे कि भात किंवा तांदुळापासून बनलेले कोणतेही पदार्थ आपण ग्रहण करू नका. मित्रानो अनेक जण तुळशीचे उपाय या आषाढी एकादशीला करतात.
तुळस हि श्री हरी श्री विष्णू प्रिय आहे. भगवंतांना ती अतिशय प्रिय आहे. मात्र एकादशी तिथीला तुळशीला स्पर्श करणे , पाने तोडणे , फांद्या तोडणे , तुळशीचं रोपटं उपटन यामुळे अनेक दोष आपल्या माथी लागतात.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कि भगवान श्री हरी श्री विष्णूंना जेव्हा तुम्ही नेवैद्य अर्पण कराल तेव्हा त्या नैवैद्यावर तुळशीची दोन पाने पालथी घालावीच लागतात त्याशिवाय भगवंत नैवैद्य ग्रहण करत नाहीत.
हि तुळशीची पाने आपण दशमी तिथीस म्हणजेच एकादशीच्या आधल्या दिवशीच तोडावीत. किंवा तुळशीच्या रोपट्या खाली पडलेली पाने स्वच्छ धुवून त्याचा वापर करता येतो.
मित्रानो या दिवशी खोटं बोलणं , असत्य वचन बोलणं यापासून आपण दूर रहावं. कोणत्याही झाडाच्या फांद्या आपण या दिवशी तोडू नयेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी दशमी पासूनच ब्रम्हचर्येचं पालन करा. पत्नी पत्नीने अवश्य पालन करा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.