उद्या कामिका एकादशी. तुळशी समोर बोला हे दोन शब्द , सर्व इच्छा होतील पूर्ण

0
546

नमस्कार मित्रानो

मित्रांनो उद्या कामिका एकादशी आलेली आहे. चातुर्मास सुरु झाल्यानंतर हि पहिलीच एकादशी आहे. तसेच येत्या सोमवार पासून श्रावस मास सुरु होत आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा , सणांचा राजा म्हटले जाते. मित्रानो या दिवशी श्री विष्णूंची मनोभावे आणि विधिवत पूजा ,उपवास , दानधर्म केले जातात.

असं म्हणतात कि कामिका एकादशीची कथा श्री कृष्णाने धर्मराज युधिष्टीरला सांगितली. आणि त्या आधी वशिष्ठ मुनींनी दिलीप राजास सांगितली होती. हि कथा ऐकून त्यांना पापांपासून मुक्ती मिळाली आणि मोक्ष प्राप्ती झाली. त्यामुळेच या कामिका एकादशीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

तर कामिका एकादशीच्या दिवशी करणारा एक खास उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रानो कामिका एकादशीच्या दिवशी सर्वार्थसिद्धीयोग देखील आलेला आहे. तर मित्रानो अशा पवित्र दिवशी तुम्ही काही उपाय केले तर तुमचे जे काही विघ्न , समस्या , इच्छा आहेत त्या पूर्ण करता येऊ शकतात.

मित्रानो एकादशीच्या दिवशी कथा श्रवण करण्याचे व जागरण करण्याचे खूप मोठे महत्व आहे. या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीचे पान तोडू नका. याच दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केले जाते पण ते तुळशीपत्र आधीच्या दिवशीच तोडून ठेवावे. चुकूनही सुद्धा एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र तोडू नये.

तसेच या दिवशी तांदळाचे सेवन करणे देखील वर्जित मानले गेले आहे. त्यामुळे तांदळा पासून बनलेला कोणताही पदार्थ एकादशीच्या दिवशी खाऊ नये. मित्रानो तुम्ही खूप प्रामाणिक राहून कष्ट करून जर त्या कष्टाचे योग्य फळ मिळत नसेल तर एक खास उपाय एकादशीच्या दिवशी तुम्ही अवश्य करा.

या दिवशी सायंकाळी देवघरामध्ये दिवा लावल्यानंतर तुळशी मातेसमोर देखील एक तुपाचा दिवा प्रजवलीत करा. त्यानंतर तुळशी मातेला ७ किंवा ११ प्रदक्षिणा घाला. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ५ , ७ किंवा ११ प्रदक्षिणा घालू शकता.

प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुळशीमातेसमोर हात जोडून ” ओम नमो भगवते वासुदेवाय ” या मंत्राचा २१ वेळा जाप करा. तुळशी मातेसमोर उभे राहून २१ वेळा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. अगदी श्रद्धा भक्तीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे.

मंत्र जप झाल्यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा आहे , जीवनात ज्या काही अडचणी आहेत त्या भगवंताला सांगायच्या आहेत बोलून दाखवायच्या आहेत. आणि या समस्येतून आपली मुक्ती व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे. मित्रानो एकादशीच्या दिवशी केलेला हा सोप्पा उपाय तुम्हाला खूपच लाभदायक ठरेल.

तुमच्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या हळू हळू दूर होताना तुम्हाला दिसेल. दुःख नष्ट होईल. घरामध्ये जर आर्थिक समस्या असतील तर त्या देखील दूर होतील. माता लक्ष्मीची कृपा आणि आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील.

ज्यांच्यावर माता लक्ष्मीचा हात असतो तिथे दारिद्य , गरिबी नावाला देखील उरत नाही. तर मित्रानो एकादशीच्या दिवशी हा साधा आणि सोप्पा उपाय तुम्ही अवश्य करा. ” ओम नमो भगवते वासुदेवाय “

मित्रानो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरु नका.

वरील लेख हा सर्व सामान्य माहितीवर आणि इंटरनेट वरून मिळालेल्या माहितीवर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here