15 ऑगस्ट तिसरा श्रावण सोमवार, संकष्टी चतुर्थी. गुपचूप ठेवा येथे 5 बेलपत्र, इच्छा ताबडतोब होईल पूर्ण

0
1311

नमस्कार मित्रानो

मित्रानो १५ ऑगस्ट २०२२ श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार. मित्रानो शुभ संयोग बघा कि याच दिवशी संकष्ट चतुर्थी देखील आलेली आहे. अशा या शुभ संयोगावर महादेवांच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्याच घरात असलेल्या शिवलिंगावरती ५ बेलपत्रांचा उपाय आपण आवर्जून करा.

आपली जी काही इच्छा अनेक दिवसांपासून अतृप्त आहे , अपूर्ण आहे त्या इच्छेची पूर्तता भोलेनाथ जरूर करतील. मित्रानो हा उपाय श्रावणातील सोमवारी सकाळी , संध्याकाळी किंवा प्रदोषकाळी हा उपाय करता येण्यासारखा आहे.

हा उपाय तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा आणि प्रदोषकाळ म्हणजे सूर्य मावळण्यापूर्वीचा अर्धा तास आणि सूर्य मावळल्या नंतरचा अर्धा तास हा जो साधारणतः एक ते दीड तासाचा कालावधी असतो त्याला प्रदोषकाळ असे म्हणतात.

मित्रानो उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपण ५ बेलपत्र घ्यावी. बेलपत्र कुठेही तुटलेली , फाटलेली अथवा कीड लागलेली नसावी. अखंड असणारी ५ बेलपत्र आपण घ्यायची आहेत. त्यानंतर जवळपासच्या महादेवांच्या मंदिरात जायच आहे.

मंदिरात गेल्या नंतर सर्वप्रथम नंदी महाराजांचं आपण दर्शन घ्यायचं आहे. नंतर या नंदी महाराजांच्या डोक्यावर आपण एक बेलपत्र ठेवायच आहे. लक्षात घ्या हे बेलपत्र पालथं न घालता हे आपण सुलटे म्हणजेच सरळ ठेवायचं आहे.

बेलपत्र या ठिकाणी पालथं घालण्याची चूक करू नका. बेलपत्र नंदीदेवांना वाहताना ओम नमः शिवाय या महामंत्राचा आपण जप करायचा आहे. महिलांनी नमः शिवाय ओम या महामंत्राचा जप करावा.

त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे , मनोकामना आहे ती नंदी महाराजांना आपण हात जोडून बोलून दाखवायची आहे. त्यानंतर आपण महादेवांच्या मंदिरात प्रवेश करा. मित्रानो शिवलिंगामध्ये फक्त केवळ भगवान शिवशंभोच नाही तर माता पार्वती , पुत्र कार्तिकेय , पुत्र श्री गणेश आणि अशोक सुंदरी सहित सर्व कन्याच स्थान या शिवलिंगात आहे.

म्हणून एक बेलपत्र सुलटे करून शिवलिंगाच्या उजव्या बाजूला अर्पण करायचे आहे. अर्पण करताना ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप करायचा आहे आणि आपली इच्छा बोलायची आहे.

तिसरे बेलपत्र आपण ज्या ठिकाणी अशोक सुंदरीचं स्थान आहे म्हणजेच शिवलिंगावर जल किंवा दूध अर्पण केल्यानंतर ते वाहून ज्या ठिकाणी येतात ते स्थान. या ठिकाणी एक बेलपत्र वाहायचं आहे. इथे सुद्धा सरळ बेलपत्र वाहून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून करून इच्छा बोलून दाखवायची आहे.

चौथ बेलपत्र आपण शिवलिंगावर असलेल्या कलाशामध्ये अर्पण करायच आहे. इथे सुद्धा सुलटे बेलपत्र अर्पण करून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत इच्छा बोलून दाखवायची आहे.

आता पाचवे बेलपत्र आपण शिवलिंगावर मनोभावे अर्पण करणार आहोत. हे बेलपत्र अर्पण करताना मात्र ते पालथे अर्पण करायचे आहे. आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जास्तीत जास्त जप करत आपली इच्छा शिवशंकरांना बोलून दाखवायची आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here