नमस्कार मित्रांनो,
मित्रानो चाणक्य नीती चाणक्य द्वारा रचित एक नीती ग्रंथ आहे, ज्यामध्ये जीवन सुखमय आणि सफल बनवण्यासाठी उपयोगी सुचना दिल्या आहेत. या ग्रंथाचा मुख्य विषय मानव समाजाला जीवनाच्या प्रत्येक पैलूचा व्यवहारिक शिक्षण देणे आहे.
चाणक्य एक महान ज्ञानी होते ज्यांनी आपल्या नीती च्या आधारावर चंद्रगुप्त मौर्य ला राजाच्या गादीवर बसवले होते. जाणून घेऊया चाणक्य यांचे महत्वपूर्ण नीती जे तुम्हाला जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या वळणावर उपयोगी पडू शकतात.
जो व्यक्ती या गोष्टी मागण्यापासून लाजतो त्याला कधीच यश मिळत नाही. आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नितीमध्ये मानवी जीवनाला उपयोगी पडणाऱ्या अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्यावर अमल केल्यावर त्याला जीवनात सफलता मिळण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही.
पती पत्नी मधील प्रेम
दोघांचं प्रेम टिकून राहण्यासाठी दोघांमध्ये प्रत्येक गोष्टींवर बोलणे झाले पाहिजे. जी प्रेमी जोडी एकमेकांपासून लाजतात आणि संभोग करण्याच्यावेळी घाबरतात त्यांच्यामध्ये दुसरा पर पुरुष किंवा महिला जागा बनवू शकते. त्यामुळे संबंधाच्या वेळी कधीच लाजू नका. न लाजता पती पत्नीने एकमेकांना प्रेम द्या.
जेवत असताना कधीच लाजु नका
चाणक्य यांच्या नुसार जेवत असताना कधीच लाजु नका. कारण जे लोक खाताना लाजतात ते नेहमी उपाशीच राहतात. उपाशी व्यक्ती क्रोधाचा शिकार होतो त्यामुळे नेहमी पोटभर जेवण केले पाहिजे. जेवत असताना लाजने म्हणजे जेवणाचा अपमान केल्या समान आहे.
दुसऱ्याकडून ज्ञान घेणे
आचार्य चाणक्य यांच्या नुसार आपल्या गुरू कडून ज्ञान घेताना कधीच लाजू नये. कारण जो व्यक्ती ज्ञान घेताना लाजतो त्याचे ज्ञान नेहमी अपूर्ण राहते. आणि असा व्यक्ती कधीच यशस्वी होत नाही. म्हणून अस म्हणलं जात की अपूर्ण ज्ञान तुमची सर्वात मोठी हार असते.
उधारीचे पैसे
आचार्य चाणक्य यांच्या नुसार आपण कोणाला दिलेले पैसे परत मागितले पाहिजे कारण जो व्यक्ती आपले पैसे मागण्यास लाजतो तो कधीच धनिक होत नाही. अशामध्ये तुम्ही बरबाद होऊ शकता म्हणून कोणाला दिलेले पैसे मागण्यास कधीच लाजू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.