शनिवारी स्त्रियांनी केलेल्या या तीन घाण कृत्यामुळे संपूर्ण घर कंगाल होते…

0
770

नमस्कार मित्रानो

मित्रांनो शनिवारी काय करावे आणि काय करू नये? शनिवार हा शनिदेवांचा दिवस आहे. पौराणिक कथांच्या अनुसरे शनिदेव भगवान सूर्य यांचे सुपुत्र आहेत. ब्रह्मांडाच्या आशीर्वादाने त्यांचा प्रभाव आपल्या पिता सूर्यदेव पेक्षा अनेक पटींनी जास्त आहे.

प्रत्येक मनुष्याच्या राशीमध्ये सूर्य एक महिना एक दिवस तर चंद्र दोन महिने दोन दिवस तसेच मंगळ दीड महिना, बुध एक महिना व शुक्र एक महिन्यांपर्यंत राहतात. परंतु शानिदेव कोणत्याही राशीमध्ये अडीच वर्ष ते साडेसात वर्षे राहतात.

जातकाच्या कुंडलीमध्ये शनी देव येण्याच्या तीन महिने आधीपासूनच आपला प्रभाव दाखवणे सुरू करतात. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये शनिदेव तीन ते चार वेळेस येतात. प्रत्येक मनुष्यावर शनिदेवांचा प्रभाव हा त्यांच्या ग्रहांच्या अनुकूलते नुसार पडतो. शनिदेवांच्या वक्र दृष्टी पासून वाचले पाहिजे.

आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा काही खास चुका ज्या तुम्ही शनिवारच्या दिवशी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. यामुळे भगवान शनि क्रोधित होतात. मनापासून शनिदेवांना स्मरण करून आम्ही तुम्हाला ही महत्वाची माहिती देत आहोत.

आपल्यापैकी अनेक जण शनिवारच्या दिवशी शनिदेवांचे दर्शन घेण्यासाठी शनि मंदिरात जातात. अशावेळी तुम्ही दर्शन घेते वेळी कधीही शनी देवाच्या डोळ्यात बघू नका. असं केलं तर तुमच्यावर वाईट नजर पडू शकते. शनिदेवांच्या पायाकडे बघितल्याने व्यक्तीवर शनिदेवांची कृपा दृष्टी आणि चांगला आशीर्वाद लाभतो.

ज्यामुळे ती व्यक्ती मालामाल होते. शनिवारच्या दिवशी पती-पत्नीस दूर राहिले पाहिजे. या दिवशी संबंध बनवले नाही पाहिजे अन्यथा शनि देव नाराज होऊ शकतात. शनिवारच्या दिवशी लोखंड अथवा लोखंडाच्या वस्तू सामान गाडी अशा कोणत्याही प्रकारच्या वस्तूंची खरेदी करू नका.

वस्तू कितीही छोटी असू दे अथवा मोठी परंतु लोखंडाची वस्तू शनिवारी अजिबात खरेदी करू नका. राजा विक्रमादित्य याने शनिदेवांना लोखंडाचे आसन दिले होते. ज्यावर रागात येऊन शनिदेव यांनी वक्रदृष्टी टाकली होती.

तेव्हापासून शनिवारी लोखंड खरेदी करणे किंवा विकणे अशुभ मानले जाते. याउलट शनिवारी लोखंडाचे दान शनिदेवांना प्रसन्न करू शकते. याचे तुम्हाला शुभ फळ मिळू शकते. शनिवारी चामडे अथवा चामड्याची कोणतीही वस्तू जसे चप्पल, बूट, पर्स, बेल्ट इत्यादी खरेदी नाही केले पाहिजे.

अशा वस्तू शनिवारी खरेदी केल्यामुळे तुम्हाला सफलता प्राप्त होण्यामध्ये अनेक अडथळे येतात. शनिवारी शनी मंदिरात जात असाल तर घरी परतताना मागे वळून पाहू नका. यामुळे शनी दोष लागतो. शनी देवांची आराधना करताना आपल्या घरी प्रस्थान करा. यामुळे शनि दोष नष्ट होतो.

शनिवारी कोणत्याही प्रकारचे तेल घरी आणू नका. शनिवारी तेल आणल्याने घरी दुःख कष्ट आणि रोग येतात. या उलट शनिवारी शनी देवांवर तेल चढवल्याने शनिदेव प्रसन्न होतात. शनिदेवांना शांत करण्यासाठी घराबाहेर जाते वेळेस आरशामध्ये तुमचा चेहरा बघून जा. यामुळे सर्व काम आश्चर्यकारकरित्या पूर्ण होतील.

शनिवारी घरी कोळसा आणणे वर्जित मानले जाते. कोळसा काळ्या रंगाचा असतो. ज्याला घरी आणण्याचा अर्थ म्हणजे शनी देवाच्या स्वरूपाला घरी आणणे. हे इंधन आहे. शनिवारी कोणत्याही प्रकारचे इंधन घरी आणल्याने वाईट काळ सुरू होतो.

जुन्या झाडू ला घरातून शनिवारच्या दिवशी बाहेर काढल्याने अत्यंत चांगला परिणाम मिळतो. शनिवारच्या दिवशी तुटलेला फुटलेल्या वस्तु घरातून बाहेर काढणे अत्यंत शुभ मानले जाते. शनिवारी काळया रंगाची चप्पल अथवा काळा कपडा दान करा.

शनिवारी काळे तीळ खरेदी करणे वर्जित आहे. शनी दशेमध्ये काळ्या तिळाच्या दानाला विशेष महत्त्व आहे. यासोबतच शनिवारी मीठ देखील खरेदी करू नये यामुळे घरामध्ये आजार येण्याची शक्यता असते. शनिवारच्या दिवशी तेलामध्ये आपला चेहरा बघून दान केले पाहिजे यामुळे शनि दोष नष्ट होतो.

मित्रानो शनिदेव न्यायाचे देवक आहेत. हळूहळू येऊन हळूहळू जाणे ही शनी देवांची खासियत आहे. त्यामुळे असं कोणतेही चुकीचे काम करू नका ज्यामुळे शनि देव नाराज होतील. शनिदेव तुमचे कल्याण करो.. शुभं भवतु!

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here