नमस्कार मित्रानो
असे म्हणतात कि प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एका स्त्रीचा हात असतो. प्रत्येक पुरुषाला वाटते कि जी स्त्री लग्न करून आपल्या घरी येईल ती भाग्यशाली असावी. तिच्यामुळे आपले घर स्वर्ग व्हावे. आपल्या घराची , कुटुंबातील व्यक्तींची तिने चांगली काळजी घ्यावी व आपल्या जीवनात आनंदी आनंद असावा.
काही पुरुषांच्या बाबतीत हे खरे सुद्धा होते. त्यांच्या घरात येणारी स्त्री खरोखर आनंद आणि भाग्य घेऊनच घरात येते व घरातील संपूर्ण वातावरणात आनंद पसरवते. भविष्य पुराणात अशा भाग्यशाली स्त्रियांची लक्षणे सांगितली आहेत. ज्या स्त्रियांमध्ये हे गुण असतात त्या स्त्रिया लग्न करून ज्या घरी जातात त्या घराला स्वर्ग बनवतात.
धार्मिक स्त्री
जी स्त्री दररोज भगवंतांचे व तुळशीचे पूजन करते , घरात देवाजवळ दिवा लावते , तुळशीजवळ दिवा लावते , स्वयंपाक झाला कि आधी भगवंताला नैवैद्य देते नंतरच सर्वजण भोजन करतात त्या स्त्रीमुळे घरातील नकारात्मकता निघून जाते व घरातील वातावरण पवित्र व शुद्ध होते. अशा वातावरणात राहणारे कुटुंब सुखी व आनंदी असते.
समाधानी वृत्ती
जी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर समाधान मानते , जास्त हव्यास करीत नाही अशा स्त्रीचा पती देखील तिच्यावर आनंदी राहतो. काही स्त्रिया शेजारी एखादी वस्तू आली कि आपल्या सुद्धा घरी ती वस्तू यायलाच हवी असे वर्तन करतात. यांच्या इच्छा पूर्ण करता करता त्यांच्या पतीच्या नाकी नऊ येतात.
पत्नीच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पतीला वाईट कामात गुंतावे लागू शकते , व त्याचे वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणून जर स्त्री समाधानी असेल , तिच्या गरज मर्यादित असतील तर त्या पूर्ण करताना पतीला देखील जास्त कष्ट करावे लागत नाहीत व घरातील वातावरण आनंदी आणि समाधानी असते.
स्त्री मधील धैर्य आणि धाडस
वाईट परिस्थिती मध्ये देखील न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद स्त्री मध्ये असावी. कितीही वाईट परिस्थिती असली तरी स्त्री भक्कम पणे आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी असेल तर वाईट परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. स्त्री खंबीर असेल तर वाईट काळात देखील लवकर मार्ग सापडतो.
राग न येणे
राग न येणाऱ्या स्त्रिया मिळणे अवघड आहे. कारण राग येणे हा स्त्रीचा जन्मतः स्वभाव असतो. परंतु अतिराग करणे , चिडचिड करणे , मोठ्या किंवा कर्कश आवाजात बोलणे अशी लक्षणे स्त्री मध्ये असू नयेत. थोडा फार राग सर्वच स्त्रियांना येतो आणि तो यायलाच हवा नाही तर त्या रागाचा आतल्या आत मोठा साठा होऊन शारीरिक आणि मानसिक तणाव वाढू शकतो व त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.
जर स्त्री सारखी राग राग करीत असेल , चिडचिड करीत असेल तर त्या घरातील शांतता निघून जाते व भांडण , वादविवाद सरास होतात. म्हणून स्त्रीने संयमी व शांत असावे. समोरच्या व्यक्तीचे काही चुकत असेल तर त्याला जरूर विरोध करा पण प्रत्येक बाबतीत चिडचिड करून भांडणे करून घरातील वातावरण दूषित करू नका.
समजूतदार स्त्री
जी स्त्री प्रत्येक गोष्टीत समजूतदारपणा दाखवते , शांतपणे सर्व समजून घेते. जे आहे ते आहे आणि जे नाही ते नाही याचा शांतपणे स्वीकार करते , तसेच सर्वांशी चांगले वागते , गोड बोलते ते घर सुद्धा सुखी व आनंदी असते. ज्या घरातील स्त्री सर्वांशी गोड बोलते त्या घराला कोणीही नाव ठेवत नाही. जी स्त्री शेजारी पाजारी सर्वांशी चांगले संबंध बनवून ठेवते अशा स्त्रीच्या कुटुंबावर संकट आले तरी सर्वजण तिच्या कुटुंबाला मदत करायला धावून येतात.
जी स्त्री कडू बोलते , टोचून बोलते , वाईट बोलते अशी स्त्री सर्वांबरोबर आपले संबंध बिघडवून ठेवते व वेळ प्रसंगी तिच्या कुटुंबियांसाठी कोणी धावून येत नाही. तिच्या अशा वागण्यामुळे संपूर्ण कुटुंब अडचणीत येते.
ज्या स्त्रीच्या तळपायावर त्रिकोणाचा आकार असतो ती स्त्री खूप भाग्यशाली समजली जाते. ज्या स्त्रीच्या पायाचे तळवे खोलगट असतात अशी स्त्री सुद्धा आपल्या बरोबर सर्व प्रकारचे सुख घेऊन येते व आपल्या कुटुंबाला सुद्धा सुख समृद्धी मिळवून देते.
ज्या स्त्रीचे डोळे हरिणी सारखे असतात अशी स्त्री सुद्धा खूप भाग्यशाली समजली जाते. ज्या स्त्रीच्या बेंबीजवळ तीळ असते ती स्त्री आपल्या पतीला खूप ऐश्वर्य आणि धन मिळवून देते. ज्या स्त्रीच्या कपाळावर मधोमध तीळ असते ती स्त्री संपूर्ण घराला आनंदी ठेवते. मित्रानो अशा लक्षणांची स्त्री ज्या घरात असते त्या घरावर साक्षात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच मनोरंजक पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.