नमस्कार मित्रानो
मित्रांनो धार्मिक मान्यतेनुसार मंगळवार हा हनुमानजींचा दिवस मानला जातो. या दिवशी विधीपूर्वक हनुमानजींची पूजा करून व्रत केल्यास सुख-समृद्धी प्राप्त होते. यासोबतच संकटांपासून मुक्ती मिळण्याची मन्यता आहे.
मान्यतेनुसार हनुमानजींना संकटमोचन असेही म्हणतात. हनुमानजींची नियमित पूजा केल्याने जीवनातील अडथळे कमी होतात आणि सकारात्मक परिणामही मिळतात. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार अशा राशी आहेत ज्यावर हनुमानाची कृपा कायम राहते.
कुंभ रास : ज्योतिष शास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांना नेहमी हनुमानजींचा आधार मिळतो. कामाच्या ठिकाणी यश मिळण्यासोबतच आर्थिक लाभही होतो असे मानले जाते.
वृश्चिक रास : वृश्चिक राशीच्या लोकांना नेहमीच हनुमानजींचा आधार मिळतो. मंगळवारी विधिवत हनुमानाची पूजा केल्याने आर्थिक उन्नती होते. त्याचबरोबर घरात शांततेचे वातावरण राहते.
सिंह रास : ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीला हनुमानाची आवडती राशी मानली जाते. या राशीच्या लोकांवर बजरंगबलीची विशेष कृपा असते. या राशीचे लोक कोणतेही काम करतात त्यात हनुमानजींच्या कृपेने यश नक्कीच मिळते. हनुमान जी लोकांचे सर्व संकट दूर करतात.
ज्योतिष शास्त्रानुसार मंगळवार हा हनुमानजींचा दिवस आहे. या दिवशी विधिवत पूजा केल्याने हनुमान प्रसन्न होतात. यासोबतच त्यांची कृपाही प्राप्त होते असे मानले जाते.
मंगळवारी हनुमानजीची विधिवत पूजा करावी. सुंदरकांड पठण करावे. हनुमानजींना बेसन लाडू अर्पण करावे. हनुमानजींना सिंदूर लावावा. हनुमान चालिसा आणि बजरंग बाण पाठ करावे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.