29 एप्रिल पासून या 4 राशींवर बरसणार शनिकृपा… पुढील 7 वर्ष सोन्याहून पिवळे दिवस येणार.

0
6110

नमस्कार मित्रानो

मित्रांनो नकारात्मक परिस्थितीशी झुंज देत असताना कधीकधी मनुष्याच्या जीवनात अशा काही सकारात्मक काळाची सुरुवात होते की अचानक मनुष्याच्या जीवनातील परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास सुरूवात होते. वाईट आणि नकारात्मक काळाचा अंत होऊन शुभ काळाची सुरुवात होते.

जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ पूर्णपणे समाप्त होतो आणि अपयशांचा काळ संपून यश प्राप्तीच्या काळाची सुरुवात होते. जीवनातील दुःखाचा अंधकार दूर होऊन सुखाचे सुंदर दिवस मनुष्याच्या वाट्याला येतात.

२९ एप्रिलपासून अशाच काहीशा सुंदर काळाची सुरुवात या काही खास राशींच्या जीवनात होणार आहे. भगवान शनि देवाच्या कृपेने यांचे भाग्य बदलण्यास सुरुवात होणार आहे. आता आपल्या जीवनात परिवर्तन घडून यायला वेळ लागणार नाही.

अनेक दिवसापासून चालू असणारा पराजयाचा काळ आता समाप्त होणार असून विजयाच्या काळाची सुरुवात होणार आहे. मित्रांनो मागील अनेक दिवसापासून आपण बराच संघर्ष करत आहात पण आता इथून आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ समाप्त होणार असून यश प्राप्तीच्या काळाची सुरुवात होणार आहे.

जीवनातील अमंगल काळ आता समाप्त होऊन शनीच्या कृपेने आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक ग्रहदशा आता समाप्त होणार आहे. ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहे त्यामुळे याकाळात नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.

मित्रानो भगवान शनि हे न्यायाचे देवता आणि कर्मफलाचे दाता मानले जातात. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. मित्रांनो मनुष्याच्या जीवनात प्रगती घडून येण्यासाठी शनीचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक असते.

जेव्हा शनी शुभ फळे देतात तेव्हा भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. शनिची कृपा बरसते तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनु शकतो. शनिची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते. गरजू लोकांना दानधर्म केल्याने शनिमहाराज विशेष प्रसन्न होतात.

मेष रास

मेष राशीसाठी सध्या चालू असणारा काळ मोलाचा ठरणार आहे. ग्रहांची अनुकूलता आणि जोडीला शनीचा आशीर्वाद असल्यामुळे या काळात बनवलेल्या योजना पुढे चालून लाभकारी ठरणार आहेत. करिअरमध्ये अनुकूल काळ येणार असून आलेल्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करून घेणे आवश्यक आहे.

या काळात आपले सामाजिक संबंध सुधारणार आहेत. ओळखी मध्ये वाढ होईल. घर परिवारात किंवा नातेसंबंधांमध्ये चालू असणारा तनाव दूर होणार आहे. कोर्टकचेऱ्यात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणारा आहे.

वृषभ रास

वृषभ राशिवर शनिची विशेष कृपा बसणार असून ग्रह नक्षत्राची अनुकूलता लाभणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. शनीच्या कृपेने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. कार्यक्षेत्रातून पैशाची आवक वाढणार आहे. आर्थिक प्राप्ती मध्ये पहिल्या पेक्षा चांगली सुधारणा घडून येईल.

आपल्या कामाई मधे वाढ दिसून येईल. आपल्या यश आणि कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे नवे किर्तीमान स्थापन करण्याची वेळ आली आहे. या काळात आपल्या माता-पित्यांची सेवा करणे आवश्यक असून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा लागणार आहे.

तुळ रास

तूळ राशीसाठी आता काळ सकारात्मक बनत आहे. कार्य क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करून घेणे आवश्यक आहे. उद्योग व्यापारात नवे आर्थिक व्यवहार जमुन येतील. घर परिवारात चालू असणारा कलह नातेसंबंधातील ताण तणावाचे वातावरण दूर होऊन मानसिक समाधानात वाढ होणार आहे.

योजलेल्या योजना वेळेवर पूर्ण होण्याचे संकेत आहेत. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. न्यायालयीन प्रकरणे मार्गी लागतील. या काळात प्रत्येक शनिवारी भगवान शनीला काळे तीळ काळे उडीद आणि काळे वस्त्र अर्पण करणे आपल्यासाठी शुभ होऊ शकते अथवा हनुमानजींना रुईची फुले अर्पण करणे लाभदायी ठरु शकते. वाणीवर नियंत्रण ठेवून बुद्धी आणि विवेकाने कामे घेण्याची आवश्यकता आहे.

कुंभ रास

कुंभ राशीला ग्रहनक्षत्राची चांगली साथ लाभणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. या काळात आपले नातेसंबंध सुधारतील. कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत.

मागील अनेक दिवसापासून आपल्या मनाला सतावणारी चिंता दूर होणार आहे. कोर्टकचेऱ्यात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. या काळात भगवान शनीला तेल अथवा लोखंड अर्पण करणे आपल्यासाठी शुभ होऊ शकते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here