नमस्कार मित्रांनो
मित्रांनो 17 जानेवारी 2023 रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश करेल. कुंभ राशीत शनीच्या आगमनामुळे अनेक लोकांच्या अडचणी वाढू शकतात. तुमच्या राशीचा समावेश यादीत आहे की नाही हे जाणून घ्या.
ज्योतिषशास्त्रात शनीला महत्त्वाचे स्थान आहे. नवग्रहांपैकी शनिदेवाला न्यायाचा देव म्हटले जाते. शनीची स्थिती आणि दृष्टी प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाची असते. कोणत्याही व्यक्तीच्या भविष्याचे आकलन करताना शनीच्या स्थितीचा प्रभाव नक्कीच दिसून येतो.
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि शुभ घरामध्ये असतो, त्याला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनीचे स्थान शुभ नसते, त्याला खूप त्रास होतो. शनि हा सर्वात मंद ग्रह मानला जातो. शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो.
ज्योतिषशास्त्रात शनिला सुख-दुःखाचा स्वामी मानले जाते. जेव्हा शनि शुभ असतो तेव्हा माणसाला सुख मिळते आणि जेव्हा अशुभ असते तेव्हा दुःख मिळते. शनि साडेसाती सुरु असताना सुद्धा शुभ फळ देतो त्यासाठी शनी कुंडलीत शुभ स्थानी असणे आवश्यक असते.
जेव्हा शनी कुंडलीत अशुभ स्थानी विराजमान होतो तेव्हा जातकांना त्याच्या साडेसातीच्या काळात अपार दुःख देतो. असा कोणीही नाही जो शनीच्या साडेसाती पासून वाचला आहे.
2023 मध्ये शनीची साडेसातीची शेवटचे चरण मकर राशीवर असेल. दुसरा टप्पा कुंभ राशीच्या लोकांसाठी तर पहिला टप्पा मीन राशीच्या लोकांसाठी सुरू होईल.
17 जानेवारी 2023 पासून कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनि ढैय्याची सुरुवात होईल. 17 जानेवारीला शनी कुंभ राशीत प्रवेश करेल. शनि संक्रमणासोबतच तूळ आणि मिथुन राशीच्या लोकांना शनि ढैय्यापासून आराम मिळेल. धनु राशीच्या लोकांवरून शनीची साडेसाती निघून जाईल.
शनीचा कोप टाळण्यासाठी हे उपाय करा
शनिवारी शनिदेव मंदिरात जाऊन शनिदेवाचे दर्शन घ्या. शनिवारी लोखंडी भांड्यात तेल भरा आणि त्यात तुमचा चेहरा पाहून भांड्यासह तेल दान करा.
रोज पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. साडेसाती आणि ढैय्या सुरु असलेल्या लोकांनी काळे कपडे घालू नयेत. दररोज दशरथकृत शनि स्तोत्राचा पाठ करा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लिक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.