2022 मध्ये शनिदेवांच्या कृपेने या 6 राशी होणार मालामाल. छप्पर फाड पैसा मिळणार.

0
835

नमस्कार मित्रानो

मित्रानो मानवीय जीवनात काळ आणि वेळ कधीही सारखी नसते. ज्योतिषानुसार मानवीय जीवन हे अस्थिर असून बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीनुसार मनुष्याच्या जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते. बदलत्या ग्रह नक्षत्रांची स्थिती मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते.

जेव्हा ग्रह दशा अनुकूल बनते तेव्हा मनुष्याच्या जीवनातील वाईट काळ संपून अतिशय शुभ आणि सुंदर काळाची सुरवात होते. २०२२ पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या ६ राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

आता आपल्या जीवनातील वाईट ग्रहदशा समाप्त होणार आहे. २०२२ पासून आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास सुरवात होणार आहे. मित्रानो मागील काळ आपल्या राशीसाठी बराच त्रासदायक आणि कठीण ठरला असणार.

या काळात आपल्याला अनेक प्रकारे संघर्ष करावा लागला असणार. अनेक अपयश आणि अपमान पचवावे लागले असतील. आता इथून येणारा पुढचा काळ प्रगतीची एक नवी कलाटणी प्राप्त करून देणारा काळ ठरणार आहे.

२०२२ मध्ये बनत असलेली ग्रहांची स्थिती , ग्रहांची होणारी राशांतरे , ग्रहयुत्या आणि ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत.

आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. मागील अनेक दिवसांपासून आपण सतत करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. आपल्या कामांना यश प्राप्त होईल. करियर , कार्यक्षेत्र , उद्योग व्यापार प्रगतीपथावर राहणार आहे.

या काळात आपले बिघडलेले नाते संबंध किंवा सामाजिक संबंध पुन्हा जमून येणार आहेत. कौटुंबिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

मेष रास

२०२२ हे वर्ष मेष राशीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. ग्रह नक्षत्राची बनत असलेली स्थिती आपल्या जीवनात आनंद आणि सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. या काळात आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा येणाऱ्या काळात पूर्ण होतील. धन प्राप्तीच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे.

वृषभ रास

येणारे वर्ष आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. राजकारण , समाजकारण , उद्योग व्यापार , नोकरी , शिक्षण अशा अनेक क्षेत्रांत भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती मजबूत बनेल. सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

सिंह रास

सिंह राशीसाठी येणारा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. या काळात नशिबाला प्रयत्नांची जोड दिल्यास यशाचे मार्ग मोकळे होतील. उद्योग व्यापार आणि व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार आहे. नोकरीत बदली अथवा बढतीचे योग येणार आहेत.

कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येणार आहे. कौटुंबिक जीवनात सुख समाधान आणि शांतीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या जीवनात अतिशय अनुकूल काळाची सुरवात होणार आहे. २०२२ मध्ये बनत असलेली ग्रहांची स्थिती आपला भाग्योदय घडवून आणणार आहे. व्यवसायातून आर्थिक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होणार आहे. या काळात आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील. मागील अनेक दिवसांपासून विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून विवाहाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत.

तूळ रास

तूळ राशीसाठी येणारे वर्ष सुख समृद्धीची बहार घेऊन येणार आहे. नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या योजना बनवणार आहात. नवीन कामाची सुरवात विशेष लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. धनप्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. यशाचे मार्ग मोकळे होतील.

कुंभ रास

कुंभ राशीच्या जीवनात आता सुखाचे सुंदर दिवस येण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. या काळात राजकीय क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

उद्योग ,व्यवसाय आणि व्यापारातून आर्थिक लाभ होणार आहेत. व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरवात होणार आहे. घर परिवारात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. प्रेम जीवनाविषयी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here