नमस्कार मित्रानो
मित्रानो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व सांगण्यात आले आहे. त्यातच मार्गशीष पौर्णिमा हि अतिशय शुभ फलदायी मानली जाते. मार्गशीष महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला मार्गशीष पौर्णिमा किंवा कुलधर्म पौर्णिमा असे म्हटले जाते.
यावर्षी येणारी हि पौर्णिमा अतिशय शुभ फलदायी मानली जाते. या दिवशी दीप दान आणि स्नानाला विशेष महत्व प्राप्त आहे. मान्यता आहे कि मार्गशीष पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीचे विधिवत पूजन करून मनोभावे प्रार्थना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.
व्यक्तीच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस संपतात आणि सुख सौभाग्याची प्राप्ती होते. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे. पौर्णिमेच्या दिवशी व्रत उपवास करून श्री सत्यनारायणाची कथा ऐकल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान धर्म करण्याला देखील विशेष महत्व प्राप्त आहे. मित्रानो पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या संपूर्ण कलानी युक्त असतो. चंद्राला मनाचा कारक मानले जाते. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात.
या वेळी येणारी पौर्णिमा हि अतिशय शुभ फलदायी मानली जात आहे. या पौर्णिमेला अतिशय शुभ संयोग बनत आहेत. मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी श्री दत्त जयंती आहे. हा दिवस श्री गुरुदत्तांचा जन्म दिवस म्हणून साजरी केला जातो. हा संयोग या काही खास राशींसाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.
माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून भगवान दत्तात्रयांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. इथून येणारा पुढचा काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे.
मार्गशीष शुक्ल पक्ष रोहिणी नक्षत्र दिनांक १८ डिसेंबर रोज शनिवार सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी पौर्णिमेला सुरवात होणार असून दिनांक १९ डिसेंबरच्या सकाळी १० वाजून ६ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.
पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि ऐश्वर्यात वाढ होणार आहे. जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होईल.
उद्योग , व्यापार आणि कार्यक्षेत्रात भरभराट पहावयास मिळणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार असून सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. हा काळ आपल्या जीवनातील अतिशय अनुकूल काळ ठरणार आहे.
अनेक दिवसांपासून अडलेली कामे आता पूर्ण होणार असून हा काळ आपल्या जीवनातील अतिशय लाभकारी काळ ठरणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने येणारा काळ आपला भाग्योदय घडवून आणू शकतो. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , सिंह , कन्या , तूळ , वृश्चिक , मकर आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.