नमस्कार मित्रानो
मित्रानो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहनक्षत्रात होणारे बदल मानवीय जीवनावर खूप मोठा प्रभाव पाडत असतात. ग्रहनक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही वाईट किंवा नकारात्मक काळ चालू असुद्या ग्रहनक्षत्राची स्थिती जेव्हा शुभ बनते तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही.
दिनांक १२ फेब्रुवारी पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. कारण १२ फेब्रुवारी रोजी ग्रहांचे राजा सूर्यदेव हे राशी परिवर्तन करणार आहेत.
मित्रानो सूर्य हे ऊर्जेचे कारक मानले जातात. ते मानसन्मान आणि पद्प्रतिष्टेचे दाता मानले जातात. सूर्याचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीचा भाग्योदय घडवून आणण्यास पुरेसा असतो. यावेळी सूर्य मकर राशीतून निघून कुंभ राशीत गोचर करणार आहेत.
ज्योतिषानुसार सूर्य हे नेहमी सरळ चालीने चालणारे ग्रह मानले जातात. सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. सूर्याच्या होणाऱ्या या राशीपरिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार असून या राशींसाठी हे गोचर शुभ परिणाम घेऊन आले आहे.
मेष रास
सूर्याचे कुंभ राशीत होणारे गोचर मेष राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. कार्यक्षेत्रात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. सूर्य या काळात आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. आपल्या मानसन्मान आणि पद्प्रतिष्टेमध्ये वाढ दिसून येईल. आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये देखील वाढ होइल.
वृषभ रास
सूर्याचे हे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. वृषभ राशीसाठी काळ अतिशय शुभ ठरणार आहे. सरकार दरबारी अडलेली कामे पूर्ण होतील. या काळात आई वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. जुने वाद मिटतील. नवीन उद्योग सुरु करण्यासाठी काळ विशेष अनुकूल आहे.
सिंह रास
सिंह राशीसाठी काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. सूर्य आपल्या राशीचे स्वामी आहेत. सरकार कामासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसांपासून कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. कामे व्यवस्थितरित्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत. मानसिक ताणतणाव दुर होईल. आर्थिक स्थिती मध्ये सुधारणा होईल.
कन्या रास
सूर्य आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. या काळात शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. एखादे अपूर्ण स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. विदेशातून नोकरी विषयी कॉल येऊ शकतो. एखादे मोठे काम आपल्या हातून घडू शकते.
वृश्चिक रास
आपल्या मानसन्मान आणि पद्प्रतिष्टेमध्ये वाढ होणार आहे. पारिवारिक सुखात वाढ होण्याचे संकेत आहेत. असे असले तरी एखादी चिंता , काळजी , हुरहूर आपल्या मनाला लागून राहणार आहे. या काळात आरोग्याची काळजी घ्या. पथ्य , पाणी पाळणे आपल्या हिताचे ठरेल. भावकीतील वाद मिटतील. कोर्ट कचेरीची कामे कोर्टाबाहेरच निपटवणे हिताचे ठरेल.
मकर रास
हे राशीपरिवर्तन आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. अनेक दिवसांपासून अडलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे.
अचानक धनलाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत. धन प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. या काळात आरोग्याची काळजी घ्या. हाडांचे आजार त्रासदायक ठरू शकतात.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.