नमस्कार मित्रांनो
मित्रांनो ज्योतिषानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो किंवा वक्री होतो तेव्हा त्याचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण बारा राशी वर पडत असतो. दिनांक 10 सप्टेंबर रोजी बुध ग्रह वक्री होणार आहेत.
बुध कन्या राशीमध्ये वक्री होणार आहेत. 10 सप्टेंबर रोजी बुध स्वतःच्या राशीत वक्री होणार आहेत. बुध ग्रहाला वाणी , भाषा , बुद्धी , संचार आणि गणित , उद्योग व्यापाराचे कारक ग्रह मानले जाते.
बुध ग्रह कुंडली मध्ये ज्या वेळी शुभ स्थितीमध्ये असतो किंवा मजबूत स्थितीमध्ये असतो अशा वेळी व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. बुधाच्या सकारात्मक प्रभावाने उद्योग, व्यापार, कला, साहित्य, बँकिंग अशा अनेक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी अतिशय सकारात्मक दिवस येऊ शकतात.
दिनांक 10 सप्टेंबर 2022 रोज शनिवारी सकाळी 8 वाजून 43 मिनिटांनी बुध ग्रह कन्या राशी मध्ये वक्री होणार आहेत आणि त्यानंतर 2 ऑक्टोबर 2022 रोज रविवार बुध ग्रह कन्या राशी मध्ये मार्गी होणार आहेत आणि त्यानंतर दिनांक 26 ऑक्टोबर 2022 रोजी बुध कन्या राशीतून निघून तूळ राशी मध्ये राशी परिवर्तन करणार आहेत.
बुधाच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा किंवा बुधाच्या वक्री होण्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव तूळ राशीच्या जीवनावर दिसून येणार आहे. आता आपल्या जीवनात सकारात्मक काळाची सुरवात होणार आहे. अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे.
आता इथून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. बुधाचे वक्री होणे तूळ राशीसाठी अतिशय अनुकूल आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. विशेष करून पारिवारिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत.
नोकरी मध्ये नवीन संधी चालून आपल्याकडे येतील. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. उद्योग व्यवसायाला आर्थिक जोड प्राप्त होऊ शकते. एखाद्या मोठ्या उद्योग पतीची मदत आपल्याला या काळात प्राप्त होऊ शकते. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील.
व्यापाराच्या दृष्टीने अतिशय अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. जीवनात जोडीदाराचे चांगले सहकार्य प्राप्त होईल. जीवनात स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे.
या काळात संततीकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. पारिवारिक जीवनात शांती राहणार आहे. बुधाचे वक्री होणे आपल्यासाठी सर्वच दृष्टीने लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात.
न्यायालयीन अथवा सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. सरकार दरबारी अनेक दिवसांपासून अडलेली आपली कामे आता पूर्ण होतील. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या अनेक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.
तूळ राशीच्या जातकांसाठी अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगली साथ आपल्याला लाभणार आहे. अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील.
या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे. खाण्यापिण्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. उद्योग व्यापारात भरघोस यश आपल्या पदरी पडू शकते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.